![]() |
- शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरला शेतकऱ्यांचा जोडीदार,
- बैलांनी केला सरकारचा निषेध .
यवतमाळ: २६ विधिमंडळात शासनाने बोन्डअळी ग्रस्तांना घोषित केल्या गेलेली हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपये हेक्टरी मदत सरसकट व तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती ,काँग्रेस,मनसे, शेतकरी संघटना,बेंबळा कालवे संघर्ष समिती यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसह त्याच्या शेतीतील जोडीदाराने बैलाने उपस्तिथ राहून शासनाचा निषेध नोंदविला.'आमच्या मालकाला वाचवा,त्याला मदत करा'अशा प्रकारच्या व सरकारविरोधी धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा बैलांच्या झुलीवर लिहिलेल्या होत्या याच बैलांचा संदर्भ घेत शेतकरी नेते मा.विजयभाऊ जावनधिया शेतकऱ्यांच्या आंदोलनात बैलांसारख्या मुक्या प्राण्यालाही संवेदना आहेत.मात्र या सरकारला नाहीत.मागील सरकार न केलेल्या चुकांचा सतत दाखला दिला देत आहेत.मात्र नवे काही करीत नाही ,केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे.मोदी कापूस मुख्य पीक असणाऱ्या गुजरतेतून आलेले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर तिथे या हंगामात क्विंटलमागे कापसाला ५००/- रूपये बोनस दिला गेला मात्र महाराष्ट्रात बोनस दिला गेला नाही,हे वास्तव आहे.शेतकऱ्यांनी तात्काळ मदत मिळावी अन्यथा येणाऱ्या काळात वेगळी भूमिका घेण्याची तयारी शेतकऱ्यांनीआपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.या प्रसंगी शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या "अळी रे अळी गुलाबी बोन्डअळी सरकारने घातला पाताळात बळी"नमपते बोला हर हर महादेव.चक चक चाहडा, बैल बहाडा,सरकार गेलय बेशरमाच्या बुडा,बळी राजा माग त्यांना,मतदानाचा झाडा.नमपते बोला हर हर महादेव.आजच्या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते विजय जावनधिया,शिवाजीराव मोघे,वसंतराव पुरके,डॉ.वजहात मिर्झा ,बाळासाहेब मानगुळकर,राहुल ठाकरे,प्रवीण देशमुख,अशोक बोबडे,अरुण राऊत मनसेचे अनिल हमदापुरे, तातू देशमुख,डॉ. मोहम्मद नदीम,दिनेश गोगरकर,सुधीर जवादे,अनिल गायकवाड, रवी ढोक,प्रफुल मानकर,माधुरी आडे,माधुरी अराठे,विकी राऊत,लोकेश इंगोले,शैलेश डाखोरे,सिकंदर शहा,चंद्रशेखर चौधरी,स्वाती येडे,अशोक भुतडा,नंदिनी दरने,राजेंद्र गोवनडे,धनराज चव्हाण,ओले पाटील,मनमोहन चव्हाण,प्रकाश नवरंगे,जीवन पाटील,मीनाक्षी वेट्टी, वैशाली सवाई,उषा दिवटे,कौस्तुभ शिर्के,अतुल राऊत श्रीकांत देशमुख,जफर खान,या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
