विलास नसले
उपायुक्तांनी घेतली आढावा बैठक - दि. 31 पर्यंत 2375 शौचालय बांधण्याचे निर्देश
तालुक्यातील 86 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न
मुर्तिजापूर - शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दि. 31-01-2018 पर्यंत तालुक्यातील 86 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्याचे स्पश्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने 2011 साली केलेल्या सर्वेनुसार तालुक्यात एकुण 27546 लाभाथ्र्यांची यादी करण्यात आली होती. त्यापैकी 25771 शौचालय बांधण्याचे लक्ष पूर्ण करण्यात आल्याचा दावा संबंधीत विभागाकडून करण्यात आला आहे. तालुक्यात 8558 शौचालय बांधण्याचे लक्ष साध्य करावयाचे होते. त्यापैकी 5304 शौचालय बांधण्यात आले आहे. उर्वरीत 2375 शौचालय दि. 3-01-2018 पर्यत पूर्ण करावयाचे आहेत. यामध्ये 779 शेअरींग शौचालय आहेत. सदर शौचालय बांधकाम पूर्ण झाले नाही तर कार्यवाहीचा बडगा उगारल्या जाणार असल्याचे म्हटल्या जात आहे.असे असले तरी अद्यापही सुस्तपणे सुरू असलेल्या कामांमुळे अनेक गावे हागणदारी मुक्तीपासून दूर असल्याचे दीसून येत आहे. तालुक्यातील एकुण 86 ग्रामपंचायतीपैकी 51 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचा दावा पंचायत समिती तर्फे करण्यात येत आहे.मागील काही दिवसांपूर्वी जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुर्तिजापूर येथे बैठक घेवून सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दि. 17-01-2018 रोजी उपायुक्त राजेरामजी भेंडे विकास अमरावती यांनी संपूर्ण ग्रामपंचायतीचा आढावा घेतला. यावेळी देखील वेगवेगळया सूचना देण्यात आल्या. ग्राम सेवकांची रिक्त पदे तसेच काही ग्रामसेवकांद्वारा या योजनेच्या कामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अद्यापही अनेक गावांच्या हागणदारी मुक्त योजनेत प्रगती झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सदर योजना आढावा बैठकींच्या भोव-यात अडकल्याचे म्हटल्या जात आहे. या बैठकीला उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत श्री कुलकर्णी जि.प. अकोला, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पा. व स्व. )श्री.मानकर जि.प.अकोला, सामान्य प्रशासन उपमुख्यकार्यकारी श्री खिल्लाले, गटविकास अधिकारी अगर्ते, तसेच सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शाखा अभियंता यांची उपस्थिती होती. तालुक्यातील 2375 शौचालयांचे काम 31-01-2018 पर्यंत पूर्ण होउन तालुका हागणदारी मुक्त होईल का याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.बेसलाईन कुटुंबांचा सर्वे प्रमाणे यादया सादरकरून लार्भाथ्र्यांकडील शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना आढावा बैठकीत वरिश्ठांनी दिल्या आहेत. 2011 साली झालेल्या सर्वेमध्ये काही कुटुंब या योजनेत सुटलेले असून अशा कुटंुबांच्या यादया ग्रामपंचायत स्तरावर संकलीत करून ठेवण्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.- श्री बि.पी. पजई विस्तारधिकारी (पंचायत)
