राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा


मकसूद अली 
  •   प्लॉस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नका
  •    जिल्हाधिकारी यांचे आवाहन


यवतमाळ, दि. 24 : राष्ट्रीय सन म्हणून आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजान नागरीकांचे कर्तव्य आहे. तसेच प्लॉस्टिकचे ध्वज हे लगेच नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होवू शकतो त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्लॉस्टिक ध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजान व जागरूक नागरीक यांनी राष्ट्रध्वज ऐकत्र गोळा करून तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणे सुपुर्द करावे. त्यानंतर राष्ट्रध्वज संहितेच्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी.26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी प्लॉस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post