![]() |
अकोला: शासनाकडून मिळणारा घरभाडे भत्ता आणि प्रवासभत्ता घेऊनही अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रेनिंग सेंटरमधील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या खोलीत ठाण मांडून बसलेले जनऔषधशास्त्र विभागाचे वादग्रस्त प्रमुख डॉ. अरुण हुमने यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाची दिशाभूल करीत आपण बाहेर भाड्याने राहात असल्याचे दाखविण्यासाठी चक्क जनऔशधशास्त्र विभागातच कार्यरत असणारे डॉ. नंदकेशव अस्वार आणि त्यांच्या पत्नी तथा सहयोगी अध्यापिका डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांच्याच, शहरातील कौलखेडनजीकच्या कृष्णनगरी भागातील घराचा निवासी पत्ता दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, यासंदर्भात डॉ. अस्वार दाम्पत्याने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये रितसर लेखी तक्रारही दाखल केली असून, पोलिसांनी याप्रकरणी बयाण नोंदविण्यास सुरुवात केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.डॉ. अरुण हुमने हे जनआषधशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाहेरगावाहून बदलीवर आलेल्या अनेक प्राध्यापकांपैकी ते एक आहेत. अशाप्रकारे बदली होऊन आलेल्या आणि बाहेर भाड्याने खोली घेऊन राहणाया प्राध्यापकांना शासनाकडून घरभाडे भत्ता तसेच घरुन महाविद्यालयात येणे-जाणे करण्यासाठी प्रवासभात्ताही दिला जातो; मात्र त्यासाठी त्यांना ते भाड्याने राहात असल्याचा पुरावा सादर करावा लागतो. त्यानुसार येथील प्राध्यापकांनी तसे पुरावेही शासनाला सादर केले आहेत. परंतु डॉ. अरुण हुमने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या अखत्यारीतील एका खोलीत गेल्या अनेक महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत. असे असतानाही त्यांनी शासनाकडून घरभाडे भत्ता आणि प्रवासभत्ता लाटण्यासाठी आपण कौलखेडनजीक असणाNया राधाकृष्ण मंदिराजवळ कृष्णनगरी परिसरात घर क्रमांक २३६ येथे राहात असल्याचे दर्शविले आहे, त्यासाठी त्यांनी डॉ. नंदकेशव अस्वार आणि डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांच्याच घराचा पत्ता देण्याचा प्रताप करीत शासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार डॉ. अस्वार दाम्पत्याने सिटी कोतवाली पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. डॉ. अस्वार दाम्पत्याने दाखल केलेल्या तक्रारीत डॉ. अरुण हुमने यांचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. हुमने यांनी भारतीय आयुर्विज्ञान परिषद, दिल्ली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयास आपल्या स्थाया निवासाचा पुरावा म्हणून डॉ. अस्वार यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या घरचा पत्ता आणि त्यांच्याच वीजबिलाचा गैरवापर केला आहे. याद्वारे हुमने डॉ. अस्वार यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यांची आर्थिक लुबाडणूक आणि फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. अस्वार दाम्पत्याने तक्रारीत नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर हुमने हे आमच्या घरच्या पत्त्यावर गुंडप्रवृत्तीच्या लोकांना पाठवून मानसिक त्रास देत असल्याचेही सदर तक्रारीत म्हटले आहे.
