दारुबंदी साठी फक्त ४० टक्के मतदान



सैय्यद मुजीबोद्दीन
  • १४५६ पैकी ५८३ मतदान.
  •  उभ्या बाटलीचा विजय

  झरी :- तालुक्यातील पाटण येथे दि.३० जानेवारी रोजी आडवी बाटली व उभी बाटली करिता मतदान घेण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत सकाळी ८ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत आडव्या व उभ्या बाटली साठी मतदान घेण्यात आले , १४५६ पैकी ५८३ महिलांनी ४० टक्के मतदान केले. पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान झाल्यामुळे दारु परवाना धारकाचा विजय झाला म्हणजेच उभ्या बाटलीचा विजय झाला त्यामुळे स्वामींनी दारूबंदी चे तालुका संघटक रामलु आईटवार  यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.  बूथ नंबर १ भाग क्रमांक २७२ मध्ये ६०९ महिलापैकी २४४ महिलांनी ४०:०६ टक्के मतदान केले. बूथ क्रमांक २ भाग क्रमांक २७३ मध्ये ४६३ महिलापैकी १७३ महिलांनी ३७:७४ टक्के मतदान केले. बूथ नंबर ३ भाग क्रमांक २७४ मध्ये ३८४ महिलापैकी १६७  महिलांनी ४३:४८ टक्के मतदान केले.१४५६ पैकी ५८३ मतदान महिलांनी केले. ४०:०४  टक्के एकूण मतदान झाले त्यानंतर ५ वाजता मत गणना घेण्यात आली त्यात आडव्या बाटलीला ४१०,  उभ्या बाटलीला ११५, व ५८, मत अवैध झाले त्यामुळे आडव्या बाटली चा पराभव झाला असून उभ्या बाटलीचा विजय झाला. पाटण येथील महिलांनी दारू बंदी करीता मतदान न करता राजकीय दबाव व आर्थिक देवाण घेवाण मुळे उभ्या बाटलीला मतदान करण्यास भाग पाडल्याचा आरोप रामलू आईटवार यांनी केले आहे. आम्हाला पाच ऐवजी दोन वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ देऊन कमी मतदान झाल्याने उभ्या बाटलीला स्थान मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून पुन्हा मतदान घेण्याकरीता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक अधिकारी गणेश राऊत यांच्या मार्गदनाखाली केंद्र क्र १ मध्ये नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, चंद्रकांत भोयर, अमर पडवेकर, तुळसीदास गोहणे, केंद्र क्र २ मध्ये विलास बोलपल्लीवार, महेंद्र देशपांडे, अशोक पंधरे, दीपक जोगी, केंद्र क्र ३ मध्ये विजय मते, अविनाश येरावार, राजेंद्र मेश्राम, प्रवीण नागतुरे, शिपाई महादेव मोहुर्ले, गटविकास अधीकारी सुभाष चव्हाण, दुय्यम गटविकास अधिकारी शिवाजी गवई, तलाठी  बाळकृष्ण येरमे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा कृष्णाजी आखरे, दुय्यम निरीक्षक वणी कुंदन कुमरे, अविनाश पेंदोर, पवार, रामटेके ह्यांनी कामगिरी पाडली ठाणेदार लष्करे, पीएसआय अनिल चौधरी, अमोल अनेरवार, द्न्यानेश्वर सोयाम, सपना पंधरे, जया रोगे व इतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्तात पार पाडले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post