पत्रकार संघामुळे ती चिमुकली झाली अखेर कायदेशीर दत्तक


बीड (प्रतिनिधी)  नेकनूर येथील स्त्री कुटीर रुग्णालयात प्रस्तुतीवेळी मातेचा मृत्यू झाला. मातृछत्र हरपलेल्या त्या चिमुकलीचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरलेल्या त्या पित्याने जड अंतःकरणाने तिला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पत्रकार संघाने पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला मायबाप मिळवून दिले.शनिवारी दुय्यम निबंधक , जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कायदेशीररित्या दत्तकत्व प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली.नेकनूर येथील रामलिंग सांगळे यांची पत्नी मीना हिचा नेकनूर स्त्री रुग्णालयात प्रस्तुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर हतबल झालेल्या पित्याने गुडघे टेकत तिचा सांभाळ करण्यास असमर्थता स्पष्ट केली. त्या निरागस नकोशीला अनाथाश्रम मध्ये सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोषजी मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हासचिव शेख वसीम, संघटक अमजद खान, सहसंघटक शेखअय्युब आदीनी पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला अखेर गरजूवंत मायबाप प्रशांत आणि बरखा पोरवाल हे मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली. यानंतर दत्तकत्व देण्याची कायदेशीर प्रक्रिया दि 20 जानेवारी 2018 रोजी पूर्ण करून बाळ पोरवाल कुटुंबाकडे अधिकृत सुपूर्द करण्यात आले.यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधक एस ए पोकळे तसेच ए जी पठाण, चाटे, शेख फेय्याज, शिंदे आदींनी या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करून दत्तकत्व प्रक्रिया पार पडण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली.निंबधक कार्यालयात माणुसकीचे अनोखे दर्शन त्या नाकोशीला पत्रकार संघाच्या सामाजिक जाणिवेतून हक्काचे मायबाप मिळाल्यानंतर कायदेशीर दत्तकत्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्यानंतर तेथील सह दुय्यम निबंधक एस एच गोपवाळ यांनी स्वतःहून निंबधक कार्यालयातील नोंदणी खर्च खिश्यातून करत अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post