मुर्तिजापुर प्रतिनिधि - मुर्तिजापुर शहरात प्रथमच विशाल तुलादान व गो पूजन कार्यक्रमा चे आयोजन श्री पुण्डलिकबाबा गोरक्षण च्या वतीने रविवार दिनांक 14 जानेवारी 18 रोजी सकाळी 10 ते 5 वां पर्यन्त पुंडलिक बाबा मंदिर मागे आयोजित करण्यात आले होते. शास्त्रा नुसार मकर संक्रांति या अवधिला दिलेले दानाचे फळ शंभर पटिने वाढते. विशेषता तुलादान केलेल्या दाना चे पुण्य फळ अधिक आहे. करीता मकर संक्रांति ला लोक आपल्या वजना एवढे इस्ट वस्तु चे दान करतात. पंडित मनीष शास्त्री शिवनकर , नितिन धर्माधिकारी व् सहकारी यांच्या पुरोहित्यात विधिवत गोपूजन नैवेद्य देऊन तुलापुजन ने तुलादान ची सुरुवात करण्यात आली.तुलदानाने सर्व ग्रह, बाधा,संकट निवारण होऊन मोक्ष ची प्राप्ति होते.आणि म्हणूनच या मकर संक्रांति च्या पुण्य प्रसंगी तुलादान च्या विशेष महत्वा ला अनुसारून रामसापीर सेवा समिति चे अनूप अग्रवाल यांच्या वतीने गोरक्षण सेवकांना ब्लैंकेट वाटप करण्यात आले तर डॉ सारडा , बालमुकुंद निमोदिया परिवार,श्रीमति विमला ओमप्रकाश अग्रवाल,श्रीमती भवरी बाई कपूरचंद अग्रवाल,गोकुलचंद दज्जुका, शाम सुन्दर अग्रवाल, कैलाश अग्रवाल ,शोभादेवी अग्रवाल,दामोधर अग्रवाल, रामजीवन बाहेती, गायत्री परिवार च्या करुणा घुमसे, अन्नू सेठ जेठवानी, सुनील भुत, गोविन्द निमोदिया, नर्मदाबाई कपिले, विट्ठलराव गुल्हाने, गोपालदास निमोदिया, नगरसेवक संजय डागा, वसन्त राव धर्माधिकारी, केशव कवलकार, विवेक काम्बे, विशाल खंडेलवाल, विजय हुँदानी, पचेरिवाल परिवार, आदित्य दुधे,पुंडलिक बाबा मंदिर चे विट्ठलराव पातोंड दीपक भूत, भूतडा इचलकरंजी,विष्णु अजमीरे, देवकीबाईं सोमानी,दामू अन्ना गुल्हाने, व्यंकटेश तिवारी, कमलाकर गावंडे, मनोज वर्मा , महादेवप्रसाद खंडेलवाल जबलपुर ई. नी विविध मन इच्छित वस्तु चांदी, धान्य, तेल,कपडे, वस्त्र, अनाज,द्वारे काहिंनी सपत्नीक तर काहिंनी सह परिवार कुटुंबा सहित तुलादान केले. या प्रसंगी तुलादान ला लागनारी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील सर्व गो भक्तानि व् अबाल वृधानी या गोमातेच्या पूजन व तुलादान मधे आपला सहभाग नोंदवून तसेच बाहेर गावावरून गोभक्तानि फोन द्वारे संकल्प घेऊन पुण्य फळा चे लाभ घेतले .कार्यक्रमच्या यशस्वीते करीता गोरक्षण चे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मचारी,सेवक यांनी परिश्रम घेतले.