प्रतिभा तिडके व्याख्यानमालेचे 29 व 30 जानेवारीला आयोजन

विलास नसले 
मुर्तिजापूरविदर्भाला गौरव असलेली प्रतिभा तिडके व्याख्यानमालाचे दि. 29 व 30 जानेवारीला श्री गाडगे महाराज विद्यालयाच्या सभागुहामध्ये  रतन टाॅकीज समोर मेन रोड, मुर्तिजापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यान सायं. 7 ते 9 पर्यंत चालणार आहे.श्रीमती प्रतिभाबाई भगवंतराव तिडके यांच्या स्मुती प्रित्यर्थ ही व्याख्यानमाला गेल्या चार दशमापासून सुरू आहे. प्रस्तुत व्याख्यानमालेमधुन आता पर्यंत ना.ग.गौरे, मधू दंडवते, प्रमिलाताई दंडवते, डाॅ. श्रीराम लागू, अभय बंग, राणी बंग, चंद्रषेखर धर्माधिकारी, पासून सुदाम सावरकर, द.भि. कुलकर्णी, यषवंत मनोहर , गंगाधर पाणतावणे, नलिनीताई लढके, इत्यादी मान्यवरांनी मुर्तिजापूरकर रसिकांना बौध्दिक मैजावाणी दिली आहे. मुर्तिजापूर हे गाडगे बाबांच्या विचारानी पुनीत झालेली भूमी असून सांस्कुतिकदुश्टया एक महत्त्वाचे शहर आहे. येथील रसिक श्रोतेही अशा बौद्धिक प्रबोधनाला भरभरून दाद देतात. प्रतिभा तिडके या व्याख्यानमालेचे नियोजन प्राचार्य डाॅ. संतोष ठाकरे यांच्या मार्गदर्शनत होत असून यावर्षी दि. 29 जानेवारीला पहिले पुुुष्प शिवरायाचे व्यवस्थपन हया विषयावर डाॅ. सुतंत टेकाडे, नागपूर व दि. 30 जानेवारीला काश्मिर नंदनवन ते अग्निकूंड या विषयावर डाॅ. अविनाश मोहरील, अमरावती हे दुसरे पुुुष्प गुफंणार आहे. तरी रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post