पुसद न्यायालया मध्ये बार टायपिस्ट साठी टंकलेखन करीता संगणक कक्ष.


सैय्यद मुजीबोद्दीन
पुसद जि. यवतमाळ दिनांक: २६ जानेवारी - पुर्वि न्यायालया मध्ये टंकलेखन मशिन वर कामे होत होती पण आता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद कोर्टात स्वतंत्र संगणक कक्ष तयार केले असुन आता पक्षकार व वकीलांचा सोयी साठी संगणक बसविले व त्याचा उदघाटन सोहळा २६ जानेवारी रोजी पार पडला. असे कक्ष महाराष्ट्रात प्रथमच पुसद येथे तयार केले आहे. वि. उच्च न्यायालयाचे आदेशाने हे कक्ष कार्यान्वीत करन्यात आले आहेत उदघाटन तथा अनावरण सोहळा २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिना चे औचित्य साधुन करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.अंबाळकर तदर्थ जिल्हा न्यायाधिश पुसद यांनी भुष्विले तर उदघाटक एफ़. सी. वि.गावंडे जिल्हा न्यायाधिश १ पुसद हे होते तर प्रमुख उपस्थिती अॅड आशिष पंजाबराव देशमुख माजी अध्यक्ष बार काउंसील ऑफ महाराष्ट्र व गोवा तसेच पुसद वकील संघाचे अध्यक्ष अॅड जावेद वर्षाणि,सचिव अॅड अमोल आसोले हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश व्यवहारे सिनीयर बार टायपिस्ट यांनी केले व या बाबतची रूपरेषा सांगीतली तसेच वि. गावंडे, वि.अंबाळकर यांनी आपले विचार मांडले तर अॅड आशिष देशमुख,अॅड वर्षानी यांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंन्द्र कोडागिरवार यांनी केले याच दरम्यान कार्यक्रमा मध्ये वकील सदस्यांचे पाल्य रूद्रा मनोज घाटगे, मयंक कैलास राठोड , शाश्वत सुनिल नरवाडे यांना अबैकस परिक्षेत मिळालेल्या यशा बाबत सन्मान चिन्ह देवुन कौतुक कर्न्यात आले यावेळी पुसद येथील सर्व न्यायाधिश तसेच सर्व वकील,न्यायालयीन कर्मचारी हजर होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post