![]() |
मकसूद अली
यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील डोर्ली येथे पारवा येथील पत्रकार रमेश सोमेश्वर मादस्तवार हे १९ जानेवारी ला सायंकाळी साडेसहा वाजता त्याच्या घरी काम करत असताना अनिल देवराव भोग हा दारू पिवून विनाकारण शिवीगाळ करत होता, हा शिविगाळ का करून राहीला म्हणून त्याला विचारले असता तो डोळयात चटणी टाकून मारायचा प्रयत्न केला, याबाबतची तक्रार पोलीसांकडे केली असता त्याला पोलीसांनी अटक केली नाही वा साधी विचारपुसही केली नाही. पारवा ठाणेदाराला कळविले असता मी बंडेवारला सांगतो असे सांगीतले. बंडेवारला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
