![]() |
तेल्हारा प्रतिनिधी :- उद्या दिनांक 26 जानेवारी 2018 रोजी रामनवमी उत्सव शोभायात्रा समिती चे वतीने भव्य दिव्या तिरंगा मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे.आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये सर्व पक्ष ,संघटना व मंडळांचे पदाधिकारी व तेल्हारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते .उद्या दि 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जि प कन्या शाळा येथून बस स्टँड मार्गे साई मंदिर,शेगाव नाका,तुकाराम चौक,शिवाजी महाराज मार्ग,इंदिरा नगर,अण्णाभाऊ साठे मार्ग,लटीयाल भवानी मंदिर मार्गे, नाथ नगर,जिजामाता नगर,प्रताप चौक,माळेगाव नाका,बजरंग चौक,संभाजी चौक,शिवाजी चौक,जुने स्टँड ,सराफ लाईन मार्गे तानाजी चौक,तुकडोजी महाराज शाळा मार्गे शिवाजी महाराज चौक मार्गे कन्या शाळेमध्ये रॅलीचा समारोप करण्यात येईल.
