होय हे माझे शहर.....मी स्वच्छ करणारच .

ताहेर मिर्ज़ा
  •    मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू स्कुल उमरखेड तर्फे स्वच्छता रॅली चे आयोजन      
 उमरखेड.स्वच्छ सर्वेक्षण 2018  अंतर्गत स्पर्धेत उतरलेल्या व अमरावती विभागात प्रथम स्थानी राहून उमरखेड शहराची वाटचाल अत्यंत योग्य रित्या सुरू असून ह्या अभियानास प्रोत्साहित करण्यासाठी मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू स्कुल उमरखेड तर्फे आज सकाळी  9 वाजता ताज पुरा वॉर्डात स्वच्छतेचे संदेश फलक हातात घेऊन आपले उमरखेड शहर स्वच्छ व सुंदर दिसावे ह्या करीता जनजागृती केली, ह्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आजच्या ह्या स्वच्छता रॅलीस न.पा. चे नगरसेवक नितीनभाऊ भुतडा,MIM चे जिल्हाध्यक्ष इरफान ताऊ,शहाबुद्दीन कुरेशी,युवा सामाजिक कार्यकर्ता ससिद्दीक राज,राहत अंसारी सर,स्वच्छता दूत जय शंकर जवणे,उद्देश चे अध्यक्ष स्वच्छता दूत व शांतिदूत दीपक ठाकरे, ईतर स्वच्छता प्रेमी नागरिक तसेच शाळेचे सर्व शिक्षक व  कर्मचारी उपस्थित होते .


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post