![]() |
मकसूद अली
यवतमाळ - विधिमंडळात शासनाने बोन्डअळी ग्रस्तांना घोषित केल्या गेलेली हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपये हेक्टरी मदत सरसकट व तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस,मनसे, शेतकरी संघटना,बेंबळा कालवे संघर्ष समिती यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसह त्याच्या शेतीतील जोडीदाराने बैलाने उपस्तिथ राहून शासनाचा निषेध नोंदविला. 'आमच्या मालकाला वाचवा,त्याला मदत करा'अशा प्रकारच्या व सरकारविरोधी धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा बैलांच्या झुलीवर लिहिलेल्या होत्या याच बैलांचा संदर्भ घेत शेतकरी नेते मा.विजयभाऊ जावनधिया शेतकऱ्यांच्या आंदोलनात बैलांसारख्या मुक्या प्राण्यालाही संवेदना आहेत.मात्र या सरकारला नाहीत.मागील सरकार न केलेल्या चुकांचा सतत दाखला दिला देत आहेत.मात्र नवे काही करीत नाही ,केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे.प्रसंगी शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या "अळी रे अळी गुलाबी बोन्डअळीसरकारने घातला पाताळात बळी"नमपते बोला..हर हर महादेव...चक चक चाहडा, बैल बहाडा,सरकार गेलय बेशरमाच्या बुडा,बळी राजा माग त्यांना,मतदानाचा झाडा.. नमपते बोला हर हर महादेव ..., या नंतर शेतकरी व सर्व पक्ष्यांच्या वतीने एस आय टी च्या अहवालाची होळी करण्यात आली व शासन विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
