तेल्हारा पो.स्टे. येथे रक्तदात्यांनीे रक्तदान करून केला प्रजासत्ताक दिन साजरा .


प्रवीण वैष्णव

  • तेल्हारा पो.स्टे. व छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

तेल्हारा - तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तेल्हारा पो.स्टे.व छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने आज २६ जानेवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ३७ रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.सामाजिक एकता तसेच जातीय सलोखा कायम राहावा व मानव धर्माच्या दृष्टीकोनातून सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग व्हावा या उद्देशाने आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिद्र शिंदे हे शिबिराच्या अध्यक्ष होते यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषणातून रक्तदान हे श्रेष्ठदान असून रस्त्यावर इतरांचे रक्त सांडल्यापेक्षा रक्तदान करून गरजु रुग्णाचे प्राण वाचवावे असे आव्हाहन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेश खारोडे हे होते.यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान केले.यामध्ये ३७ जणांनी रक्तदान करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.यावेळी डॉ बी बी ठाकरे मेमोरियल ब्लड बँक चे विशेष सहकार्य लाभले.शिबीर यशस्वी करण्याकरिता पोलीस कर्मचारी व अशोक नेमाडे ,गजानन नेमाडे,सतीश शेळके,शिवा खारोडे,शुभम तायडे,धीरज लोणकर,सूरज खारोडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी एस आय संतोष केदासे यांनी तर आभार रवींद्र ताथोड यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post