![]() |
विलास नसले
मुर्तिजापूर प्रतिनीधी - विद्याथ्र्यांमध्ये संतांप्रमाणे सहनशिलता असणे काळाची गरज आहे. असे विचार नगर परिषदेचे मुख्यधिकारी दादाराव डोलारकर यांनी व्यक्त केले. ते भारतीय शिक्षामंडळ द्वारा संचालीत भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष न.दा.शहापूरकर तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिव विकास सावरकर, सदस्य मिलींद बंदिस्टे, संतोश पाठक, मिलींद जोत, उशाताई किडे, मीनाताई सावरकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अवधुत खंडारे, माजी मुख्याध्यापक दिपक कंझरकर, बि.एस. खंडारे यांची उपस्थिती होती. वसंतपंचमीचे अैवचित्य साधून विद्यार्थीनीनी संस्कुतमधुन सरस्वती वंदन केले. तर बालकलाकारांनी या पंढरपूराची षान गाण्यावर नुत्यसादर केले. प्रास्तवीक प्राचार्य विकास सावरकर यांनी केले. त्यानंतर संस्कुतीक कार्यक्रमास प्रारंभ झाला. यामध्ये विद्याथ्र्यांनी आपल्या कला व नुत्य सादर केले. संचालन प्रा. दिपक जोषी व वैशाली पिंगळे यांनी केले तर आभार अवधुत खंडारे यांनी व्यक्त केले.
