![]() |
मकसूद अली
- कर्ज खात्याच्या संबंधाने बँकेला अचूक माहिती देण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 31 :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, अशा पात्र शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देणे सुरू आहे. मात्र जे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांनी त्वरीत संबंधित बँकेशी संपर्क साधून आपल्या कर्जखात्याच्या संबंधाने बँकेला अचूक माहिती त्वरीत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत / खाजगी बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 64 हजार 618 खातेदारांची माहिती न जुळलेल्या शेतक-यांच्या याद्या संबंधित बँक शाखांना दुरुस्तीकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 39 हजार 856 खातेदार, भारतीय स्टेट बँक 8 हजार 136, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 3 हजार 349, बँक ऑफ इंडिया 514, बँक ऑफ महाराष्ट्र 3 हजार 960, आयसीआयसीआय बँक 276, बँक ऑफ बडोदा 705, युनियन बँक ऑफ इंडिया 1 हजार 799, एचडीएफसी बँक 434, इंडियन ओव्हरसीज बँक 101, बँक 45, कॅनरा बँक 102, आंध्र् बँक 77, आयडीबीआय बँक 492, इंडियन बँक 278, विजया बँक 21, अलाहाबाद बँक 606, युको बँक 43, कार्पोरेशन बँक 26 आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 3 हजार 798 खातेदारांचा समावेश आहे.
यवतमाळ तालुक्यात 5 हजार 80 खातेदार : यवतमाळ तालुक्यातील 5 हजार 80 माहिती न जुळलेल्या शेतक-यांच्या याद्या संबंधित बँक शाखांना पाठविण्यात आल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 2 हजार 175, विजया बँक 21, एचडीएफसी बँक 184, इंडियन ओव्हरसीज बँक 68, अलाहाबाद बँक 606, कॅनडा बँक 73, युको बँक 43, आंध्रा बँक 70, आयडीबीआय बँक 24, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 206, युनियन बँक ऑफ इंडिया 74, कार्पोरेशन बँक 26, बँक ऑफ इंडिया 25, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 519, बँक ऑफ बडोदा 334, भारतीय स्टेट बँक 412, बँक ऑफ महाराष्ट्र 181, बँक 32 आणि आयसीआयसीआय बँकेच्या 7 खातेदारांचा समावेश आहे.आर्णि तालुक्यात 6 हजार 577 खातेदार : आर्णि तालुक्यातील 6 हजार 577 माहिती न जुळलेल्या शेतक-यांच्या याद्या संबंधित बँक शाखांना पाठविण्यात आल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 5 हजार 268, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 351, बँक ऑफ इंडिया 63, भारतीय स्टेट बँक 567, बँक ऑफ महाराष्ट्र 212 आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक 116 खातेदारांचा समावेश आहे. झरी तालुक्यात 1 हजार 741 खातेदार : झरी तालुक्यातील 1 हजार 741 माहिती न जुळलेल्या शेतक-यांच्या याद्या संबंधित बँक शाखांना पाठविण्यात आल्या आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 हजार 130, भारतीय स्टेट बँक 172, बँक ऑफ महाराष्ट्र 305 आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक 134 खातेदारांचा समावेश आहे.
