रॅली काढून मतदार दिवस साजरा .


ताहेर मिर्ज़ा 
उमरखेड दि .२५ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावयाचा आहे . त्या अनुषंगाने मतदार असल्याचा अभियान मतदानासाठी सज्ज या संकल्पनेचा वापर करून उपविभागीय कार्यालय , व तहसिल कार्यालय निवडणूक विभागामार्फत मतदार दिवस शहरात रॅली काढून साजरा करण्यात आला. या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, तहसिलदार भगवान कांबळे , नायब तहसिलदार कुऱ्हाडे, बोधगीरे व तहसिल कार्यालयाचे सर्व कर्मचारी, तसेच विविध शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी , विद्यार्थांनी व शिक्षक वृंद उपस्थित होते. या रॅलीची सुरुवात तहसिल पटांगणातुन करून घेषणा देत पुर्ण शहरातुन फिरून तहसिल कार्यालय येथे विद्यार्थ्यांना अल्पोहार देवून समाप्ती करण्यात आली . त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने दि .२२जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम येणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .  

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post