![]() |
ताहेर मिर्ज़ा
उमरखेड : - सरकार कडुन जो पर्यत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यत शेतकरी सुखी होनार नाही बुलेट ट्रेन व डिझीटल इंडिया ने पोट भरत नाही तर अन्नदात्याच्या कष्टानेच भुक शमत्ते त्यासाठी शेतकऱ्याच्या प्रगती व त्याच्या शेतमालाला योग्य असा भाव मिळाला तरच शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षणात आणि व्यवसायात पुढे जातील असे प्रातिपादन खा . सुप्रिया सुळे यांनी केले त्या स्थानिक गो . सी . गावंडे महाविद्यालयात आयोजित युवक - युवती मेळाव्यात विद्यार्थ्याशी संवाद साधतांना विचारलेल्या प्रश्नांवर त्या बोलत होत्या गो सी गावंडे महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या युवक - यू वती मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा सुप्रिया सुळे , माजी खा सदाशिव ठाकरे , आ खाजा बेग , संदिप बाजोरिया , नानाभाउ गाडबैले , अॅड आशिष देशमुख , डॉ श्रीकांत पाटिल ( पुणे ) , डॉ या मा राउत , संभाजी नरवाडे , माजी जिप अध्यक्षा आरती फुफाटे , क्रांती धोटे , आशा देवसर कर , जिप संदस्य राम देवसर कर , आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थांशी दिल खुलास संवाद साधतांना विद्यार्थांच्या भावनांचा अचुक वेध त्यांनी घेतला त्या पुढे म्हणाल्या की , देशात शंभर टक्के मुले शाळेत जातात त्यातील १८ ते २० टक्केच मुले च उच्च शिक्षण घेतात व ८० मुले उच्च शिक्षणा पासुन वंचित आहेत यास सरकारची नीती धोरणे कारणीभुत असल्याचे त्यांनी म्हटले विदर्भाच्या मातीतील स्व वसंतराव नाईक यांनी सलग १२ वर्ष मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व केले शेतकऱ्याच्यां हितासाठी धडपडनारा नेता म्हणुन त्यांचा लौकीक आहे अशा नेत्याच्या भागात येऊन विद्यार्थांशी हितगुज साधन्याचे भाग्य मला लाभले असे भावोद् गार सुप्रिया ताईनी काढले युवतींच्या सुरक्षिततेसाठी छेड छाड मुक्त महाराष्ट हि माझ्या पक्षाची संकल्पना असुन सत्ता आल्यास याची अंमलबजावनी करन्याची आश्वासन हि त्यांनी दिले पंतप्रधान मोदि हे देशात परदेशात भाषन करतांना हिंन्दुस्थान असा उल्लेख करतात या देशात विविध धर्म पंथ एकत्रित राहतात त्यामुळे भारत असा उल्लेख त्यांनी केल्यास देशात धार्मिक एकोपा वाढेल असे एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देतांना त्यांनी म्हटले आमच्या पक्षाचे सरकार आल्यास माहिलांना विधान सभेत व लोकसभेत आरक्षन देन्यासाठी कटिबध्द राहु तसेच गरम डोक्याने नाही तर सकारात्मक चर्चेने समाज परिवर्तन होते तेंव्हा विद्यार्थानी शांततेला प्राधान्य द्या वे विदर्भाच्या मागासलेपनाबाबत येथील शेतीला जोड धंदयाची साथ नसल्याने शेतकऱ्यांची अधोगती होत आहे असा त्या म्हणाल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष राम देवसर कर यांनी केले तर संचलन प्रा धनराज तायडे प्रा बोम्पीलवार यांनी केले .
