माणसा माणसातील संवादासोबतच वैचारीकताही कमी होत चालली आहे.- बबन सराडकर



विलास नसले 
  सृजन साहित्य संघाच्या तिस-या राज्यस्तरीय संमेलनाचे थाटात उदघाटन 
मुर्तिजापूर :- विज्ञान हे माणसाच्या कल्याणासाठी आहे. विज्ञानाच्या उपयोगासोबतच  वापर करण्याच्या  जबाबदारीचे भान ठेवले गेले पाहिजे.  मोबाईलच्या वापरामुळे जग जवळ आले असले तरी माणसा माणसातील संवाद मात्र कमी होत चालला आहे. दुसरीकडे कलबुर्गी, पानसे, दाभोळकर अशा विज्ञानवादी दृृष्टीकोण असलेल्या विचारवंताच्या हत्या आपल्यापुढे आव्हान ठरत आहे. भोन्दु साधुंच्यामागे शिक्षिकतांचा ओढा चिंतेची बाब असून त्यांना संत गाडगे बाबा, संत तुकोबा, संत कबीर, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे बोट धरूूून चालण्यापेक्षा भोन्दुबाबांच्या मागे का जावेसे वाटते.? भोन्दुबाबांनी आभासी जग उभे करून मृगजळ दाखविण्याचे काम केले आहे. म्हणून भोन्दुबाबांची दुकाने चांगलीच चालतात. दुसरीकडे शेतक-यांच्या भोवती फिरणा-या समस्यांचा आपण मागोवा घेतला पाहिजे. ज्यांच्याकडेेअनुुुुभव आहे. त्यांनी आपल्या अनुभवातुन शेतक-यांच्या हिताच्या आणि कल्याणासाठी लिखाण केले पाहिजे. षशेवटी माणूस हाच स्रगळयांच्या जगण्याच्या केंद्रस्थानी राहावा असे विचार साहित्यीक बबनराव सराडकर यांनी व्यक्त केले. ते मुर्तिजापूर येथे स्व. कांता मामीडवार साहित्यनगरी राधामंगलम तिडके नगर येथे आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून विचार मांडत होते. या दरम्यान त्यांनी आपल्या कविता सादर करून शेतक-यांच्या खरतड जिवनांचा आणि आत्महत्येंचे प्रसंगमांडले. या संमेलनाच्या उदघाटनाच्या वेळी विचार पिठावर उदघाटक म्हणून महाराश्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरिश पिंपळे,संमेलनाध्यक्ष म्हणून धिरज अग्रवाल , नगराध्यक्षा सौ. मोनाली गावंडे, सुभद्रा फडणविस नागपूर, प्रा. कुमुदीनी दुबे, प्रा. गोपाल उपाध्ये, सुजन साहित्य संघाचे अध्यक्ष रविंद्र जवादे,प्रमोद पंत, यांची उपस्थिती होती.आपल्या उदघाटकीय विचार मांडतांना श्रीपाद अपराजित म्हणाले की, शेतक-यांच्या व्यथा नव लेखकांनी प्रकर्षाने मांडाव्यात. दातृत्वाचा मोठा धनी शेतकरी असून  शेतक-यांच्या संघर्षाचा इतिहास नव्याने मांडण्याची गरज आहे. जगण्याला बळ देणारे साहित्यातुन सुजन निर्माण झाले पहिजे. विनाशक महाशक्ती विरूध्द  देखील साहित्यातुन आवाज उचलला गेला पाहीजे.) (राजकीय व्यसपिठासोबतच वैचारीक व्यासपीठावर बसल्याने विचारात प्रगल्भता लाभते. आज तो योग सुजन साहित्य संमेलनामध्ये घडून आला. शेतक-यांच्या आत्महत्या होऊच नये या करीता सर्वांनी उपाय योजना संदर्भात मांडणी करावी. संतांच्या उपदेशानुसार वाटचाल केल्यास आत्महत्या कमी होवू शकतात. असे विचार आमदार पिंपळे यांनी व्यक्त केले. सुभदा फडणवीस यांनी देखील विचार व्यक्त केले.संमेलनानिमित्य स्टेशन विभागातील राममंदीर येथून भव्य ग्रंभ दिंडी काढण्यात आली. त्यानंतर  उदघाटकीय गीत शाम कोल्हाळे आणि संच यांनी सादर केले. यावेळी विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सुजन प्रतिभा वाडमय पुरस्कार वितरण करण्यात आले. या उदघाटकीय सत्राचे सुत्रसंचालन रविंद्र जवादे यांनी केले. तर आभार विनोद महल्ले यांनी मानले.याप्रसंगी सौ. पुुष्पा उपाध्ये, मुर्तिजापूर स्वच्छता अभियान मुर्तिजापूरचे सदस्य व इतर मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post