![]() |
मकसूद अली
यवतमाळ, दि. 26 :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आायोजित केला जातो. सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे सकाळी 10 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे . सदर लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, वैयक्तिक स्वरुपाची तक्रार, निवेदन नसावे.
तसेच महिन्याच्या तिसर-या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये अर्जाचे निरसण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. अर्ज दाखल करतेवेळी तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
