पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद जनता दरबारात एकूण 96 तक्रारी प्राप्त


अकोला दि. 22 --- मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज सोमवार दि. 22 जानेवारी 2018 रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण 96 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना जनतेच्या तक्रारीचा 15 दिवसाच्या आत निपटारा करावा असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आज पालकमंत्री यांच्या जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस रामामुर्ती, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले , मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिपक पाटील आदींसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.नवीन तक्रार कर्त्यांना 15 दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तक्रार कर्त्यांना दिला. प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागप्रमुखांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, या पुढेही नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी दक्षता घ्यावी. तक्रार घेवून आलेल्या नागरिकांची निराशा होता कामा नये. याकडे विभागप्रमुखांनी कटाक्षांने लक्ष देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात , अशा सुचना त्यांनी दिल्यात.आज झालेल्या जनता दरबारात एकूण --- तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामाबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारातील प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग --36 तक्रारी, पोलीस विभाग-- 11 , जिल्हा परिषद--32 , महानगर पालिका--05 , विदुयत विभाग--03 , धर्मदाय आयुक्त – 01, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था--04, दुय्यम निबंधक नोंदणी आणि मुद्रांक --01 ,सार्वजनिक बांधकाम विभाग--01 , जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख-01 , महिला व बालविकास अधिकारी -01 अशा एकुण 96 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. या बैठकीला अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी संजय खडसे ,अभयसिंह मोहिते , जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांचेसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post