3 फेब्रुवारी रोजी आर्णि येथे रोजगार मेळावा



मकसूद अली 
यवतमाळ दि. 29 :-  शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभाविरित्या अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दिनांक 3 फेब्रुवारी 2018 रोजी आर्णि येथील महंत दत्तराम भारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यास नामांकित कंपनीचे प्रतिनिधी तथा अधिकारी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.18 ते 40 या वयोगटातील रोजगार इच्छुक उमेदवारांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2018 रोजी आपल्या सर्व कागदपत्रांसह बायोडाटा (3 प्रत), शैक्षणिक अर्हता, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे इत्यादीसह वरील ठिकाणी सकाळी 11 वाजता स्वखर्चाने हजर राहावे. तसेच विविध रोजगाराभिमुख संधी विषयी माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्याhttp://rojgar.mahaswayam.in व श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या http://www.ncs.gov.in/pages/default.aspx या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे तसेच 07232-244395 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालकांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post