अतुल नवघरे
लाखपुरी: शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमे अंतर्गत आज दि .20/01/2018 ला लाखपूरी केंद्राअंतर्गत शोध घेवून एकूण - ८ आदिवासी विदयार्थ्यांना शाळेत दाखल केले . मेळघाटा मधून पोटाची खळगी भरण्यासाठी मुलाबाळा साहित कामा करीता लाखपुरी येथे दाखल झाले आहे . त्यांच्या सोबत चर्चा केली असता . त्या मुलांचे नाव शाळेत दाखल आहे .परंतू आमच्याकडे काम नसल्यामूळे आम्हाला भटकंती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले .सर्व मुलांना शाळेचे मु . अ . श्री सुरेश मडावी सर , केंद्र प्रमुख कु .नुतन बोबडे मॅडम, सरपंच सौ . शितल ताई तिडके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . देवचरण भाऊ जामनिक, उपाअध्यक्ष सौ .बबीता ताई भोपत, श्री सुरेशभाऊ जामनिक , वर्घट , र्गोवर्धन जामनिक , डॉ.विजय हरणे, यांच्या हस्ते शालेय गणवेश व बिस्कीट देवून त्यांचे स्वागत केले .या शोध मोहिमे मध्ये केंद्रातील शिक्षक श्री . राहुल तिडके सर, श्री. अनुप दळवी सर, अशोक कळस्कर सर, श्री . अहमद सर ,यांनी सहभाग दर्शवून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करून सामाजिक दायित्व पार पाडण्याचे कार्य केले .तसेच गावातील प्रतिष्ठीत मागरिकांनी या कार्याचे कौतूक केले .