● उद्या भव्यदिव्य पालखी सोहळा .
● राजकमल चौकात होणार फुलांचा वर्षाव .
● 21 जानेवारी अमरावतीत भाविकांचा महापारायण सोहळा .
● राज्यभरातून 26,800 पारायनार्थी होणार सहभागी .
● 6 हजार सेवेकरींची नोंदणी.
● 1 लाख भाविक भक्त घेणार महाप्रसादाचा लाभ.
अमरावती येथे रविवार 21 जानेवारी 2018 रोजी 21 हजार भाविक भक्तांचा श्री गजानन विजयग्रंथ महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला, या सोहळ्याच्या प्रारंभ दिवसाला म्हणजेच शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी श्री विजयग्रंथ शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले, शोभायात्रा श्री.गजानन महाराज मंदिर, विवेकानंद कॉलनी येथून 9 वाजता निघणार असून ती रुख्मिनी रोड, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, गाडगे नगर, शेगाव नाका, कठोरा चौक, नवसारी मार्गे रजनी मंगलम - रेवसा रोड कडून ''श्री गजानन धाम'' पारायण स्थळी भव्यरुपात पालखी सोहळा निघणार आहे,या पारायण सोहळ्यामध्ये अमरावती सहित संपूर्ण राज्यातून 21 हजारापेक्षा जास्त म्हणजे 26,800 परायनार्थी भक्तांची नोंदणी करण्यात आली, त्यासोबतच 6 हजारापेक्षा जास्त सेवेकरांची नोंदणी करण्यात आली आहे, हा सोहळा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात भव्यदिव्य ठरणार असून सर्व भाविक भक्तांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.गजानन भक्त संदीप रमेशराव बाजड, अनिता संदीप बाजड आम्ही समितीचे आयोजक म्हणून आपणास नम्र विनंती करतो, की आपण या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. ''जय गजानन .
