अध्यक्ष, प्रमुख अतिथी व उपस्थित कविंचे स्वागत करण्यात आले. निखील चव्हाण यांनी वसमत येथे संस्थेची सातवी शाखा स्थापन केल्याबद्दल, विष्णू लोडम यांची मूर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिध्दीप्रमुख म्हणून निवड झाल्याबददल, विलास वानखडे यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पूरस्कार मिळाल्याबदद्ल तर सौ. निलीमा आष्टीकर यांना विविध काव्यस्पर्धांमध्ये पारितोषीके मिळाल्याबद्दल,अध्यक्षांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक रवींद्र जवादे यांनी केले. वसमत जिल्हा हिंगोली येथे सृजन साहित्य संघाची सातवी शाखा स्थापना झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कवी रामकृष्ण आसरे , नामदेव भड , शैलेष गिरी, रवींद्र जवादे, लक्ष्मण कुऱ्हेकर, प्रशांत पंत, प्रमोद पंत, सौ. मीना जवादे, विष्णू लोडम, विनोद महल्ले,निखील चव्हाण,सुरज राठोड, विलास वानखडे,किशोर आष्टीकर, सौ. निलीमा आष्टीकर, सौ.योगिता चिंचे,निलेश उंबरकर,कु. आसावरी पंत हयांनी विविध रचना सादर केल्या. गजानन मोहरील अधीक्षक, रेल्वे स्टेशन, मूर्तिजापूर यांनी बहारदार कराओके फिल्मी गीत तर सौ.तृप्ती उंबरकर यांनी भजन सादर केले.कु. स्वाती राजुरकर हिने आपले मनोगत व्यक्त केले.
बहारदार संचलन प्रा.प्रशांत पंत यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पंत यांनी केले.मैफलीचे यशस्वीतेसाठी सौ. सोनाली पंत,कु. संस्कृती पंत,निशिकांत पंत तथा पंत परिवाराचे योगदान लाभले.परिसरातील रसिकमंडळी मैफलीसाठी उपस्थित होती,असे प्रसिध्दीप्रमुख विनोद महल्ले यांनी कळविले.
