मुर्तिजापूर :- येथील स्व.परमानंद मालाणी शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वर्ग चार ते दहा च्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढत सामाजिक संदेश दिला. शहरांमध्ये काढण्यात आलेल्या संदेशात्मक दिंडीमध्ये 'झाडे लावा झाडे जगवा' हा संदेश मागील १४ वर्षापासून शाळेच्या वतीने देण्यात येऊन जनजागृती केली जात आहे. आज देखील शहरात दिंडी काढून विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन विविध संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी कृष्ण शैलेश कडू या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची तर मुग्धा पंकज किडे या विद्यार्थिनीने रुक्मिणी ची वेशभूषा साकारली होती. आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रा.प्रतापसिंग पाटील यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष हरिया, श्रीमती गीताबाई मालाणी, मीना मालाणी, संपन्न मालाणी, गौरी मालाणी, अशोक सोमाणी, भरत मालाणी, रतन शर्मा यांची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेसह अनेक संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ-मृदंग, घोषवाक्यासह वृक्ष आपल्या डोक्यावर घेउन शहरातून विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.विठ्ठल--रुक्मिणी मंदिरात जाऊन पूजा करण्यात आली. त्यानंतर शाळेत परत आल्यावर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका प्रमिला शर्मा, पर्यवेक्षिका दीपमाला पालीवाल, अपर्णा गुल्हाने,शुभांगी गावंडे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साहाला उधाण आले होते.
स्व.परमानंद मालाणी शाळेच्या वतीने एकादशी निमित्त संदेशात्मक दिंडी