पत्रकार शफीेखान पठाण यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल - पत्रकारांनी नोंदविला तिव्र निषेध


मुतिजापुर प्रतिनिधी :- मुर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरुमचे येथील पत्रकार शफीखान पठाण यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचे षड्यंत्रकारी प्रयत्न करण्यात आला. याविरुद्ध पोलिस स्टेशन माना येथे तक्रार देऊन देखील या गंभीर प्रकरणाची दखल न घेता उलट शफीखान यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनचे ठाणेदार  घुगे व पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले व पत्रकारांची मुस्कटदाबी करत पत्रकारांचा आवाज दाबून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.

 लोकशाही करता ही गंभीर बाब असून याप्रकरणी तालुक्यातील विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार व विविध संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.  या प्रकरणी उच्चस्तरीय  तात्काळ चौकशी करून सत्य शोधून अंगावर ट्रक आणून जीवे मारण्याचा षड्यंत्रकारी प्रकार करणार्‍याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात अशी मागणी संतप्त झालेल्या मूर्तिजापूर येथील पत्रकारांनी करून तिव्र निषेध नोंदविला. आज दि.११ रोजी येथील उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन यासंबंधात माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे व पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली.     


         शफीखान पठाण यांनी कुरून रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या खदान तसेच तेथून चालणारे ओव्हरलोड ट्रकांमुळे उडणारी धूळ आणि धुळीपासून होणारे प्रदूषण याचा सर्वसामान्य नागरिक आणि पिकांना देखील फटका बसत असल्याने बाबत आवाज उठविला होता. तसेच कुरुम रेल्वे स्टेशन वरील बांधकामात होणाऱ्या भ्रष्टाचार उघड केला होता. त्यामुळे ठेकेदार निरज खोसला यांच्या सांगण्यावरून त्यांचा ट्रक चालकाने शफीखान पठाण  रस्त्या जवळील आपल्या शेताच्या कोपर्‍यावर उभे असताना त्यांच्या अंगावर ट्रक घेऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत  पठाण यांनी  रिपोर्ट देऊन आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद केले. तरीदेखील पोलिसांनी याबाबत कुठलीही गंभीरता न दाखवता उलट पठाण यांच्यावरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले. खोट्या केसेस बाबत   योग्य ती चौकशी करून शफीखान पठाण यांना न्याय देण्यात यावा व  ठाणेदार घुगे आणि पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शुक्रवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला .आणि त्याहीपुढे आंदोलनकरण्यात येतील असे निवेदनात नमुद करण्यात आले.

या वेळी मुतिजापुर तालुक्यातील सवै पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, व उपविभागीय पोलिस अधिकारी मुतिजापुर तसेच प्रतिलिपी,पंतप्रधान भारत सरकार,मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, खासदार,आमदार, विरोधी पक्ष नेते पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी अकोला,जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला , पोलीस महासंचालक मुंबई यांना निवेदन प्रतिलिपी पााठवण्यात आलेे. यावेळी  तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारीउपसथित होते.

 व मुतिजापुर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार विलास मुलमुले,पी.एन.बोळे सर,     प्राचार्य विकासभाऊ सावरकर, प्रा. दिपक जोशी, दिलीप देशमुख,दिपक अग्रवाल,मुन्ना महाजन ,अनिल अग्रवाल ,संजय उमक, विलास नसले,उमेश साखरेे, जयप्रकाश रावत, ज्ञानेश देशपांडे,संतोष माने, निलेश सुखसोहळे, विशाल नाईक, मोईज शेख, उबेद चाऊस, अजय प्रभे, प्रकाश वानरे, अतुल नवघरे, गौरव अग्रवाल, नरेंद्र खवले, प्रा. एल. डी. सरोदे, अथरखान, निखिल साखरे, स्वाती राजूरकर, रुपेश कडू , सोहेल शेख, आकाश जामणीक, गजानन गवई लाखपुरी, पंकज सातपुते, रुपेश कडू, श्याम काकडे आदी पत्रकार उपस्थित होते. ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्याच्या अध्यक्षा चंदाताई शिरसाट यांनी मुर्तिजापूर येथे भेेेट देऊन चर्चा केली. तसेच पुुढील आंंदोलनाची रुपरेेषा ठरविण्यात आली. ग्रामीण पत्ररकारांवर अन्याय सहन केेला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post