महाकाल सेनाचे हातगावं येथे शाखेचे उद्घाटन


मूर्तिज़ापुर:- मूर्तिजापूर तालुक्यातील हादगाव येथे महाकाल सेनाचे नामफलक व शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. मुर्तिजापूर ते हातगाव पर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.दुर्दैवी घटना घडल्यास सुरक्षेच्या हेतूने महाकाल सना तर्फे रुग्णवाहिका रॅली सोबत होती.

कार्यक्रमास महाकाल सेनाचे संथापक/अध्यक्ष लखनभाऊ मिलांदे उपाध्यक्ष हिराभैया दुबे सचिव पराग भगत  पोलीस पाटील मुर्तिजापूर रामभाऊ देशमुख माजी सैनिक दत्ताभाऊ निलखन,आशिष साबळे,महेश सायगन,कुणाल सूतोवणे,
व समस्त हातगाव गावकरी व महाकाल सेना कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत महाकाल सेनाच्या नामफळकाचे माजी सैनिक श्री दत्ताभाऊ निलखन यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन श्यामभाऊ काकडे यांनी केले .

महाकाल सेनाच्या कार्यक्रमास पोलीस पाटील रामभाऊ देशमुख,पराग भगत यांनी संघटनेचे महत्व आणि उद्दिष्टे सर्वांना सांगितली.लखनभाऊ यांनी आपले अध्यक्षता भाषण देतांना महाकाल सेना कुठली राजकीय संघटना नसून एक सामाजिक चळवळ आहे. महाकाल सेनाचा उद्देश युवकांना एकत्रित करून सामाजीक कार्य करण्यास प्रोत्साहीत करने आहे. कुठल्याही पक्षाशी महाकाल सेना चा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

हातगावं येथील शाखा अध्यक्ष पद  शुभम बोळे व उपाध्यक्ष निखिल सातींगे सचिव वैभव इंगळे सदस्य प्रफुल्ल इदूरकर,अक्षय राऊत,वृषिकेश बोळे,तुषार दिवेकर, ओम कथलकर,वृत्तिक सातींगे,निलेश बोळे यांना देण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post