लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरातील सांस्कृतिक सभागृह आनंद नगर येथे राज्यव्यापी (कला व क्रिडा) मुख्यमंत्री चषक अंतर्गत नृत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात उस्मानाबाद शहरातील महिला व तरुणीने आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व लोकसभा संयोजक नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप शिंदे,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष गणेश मोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन भोसले, आयोजक नाना घाटगे, परीक्षक सौ.पाटील व अनामिका मॅडम, नरेन वाघमारे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
