लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील न्यु व्हिजन इंग्लिश स्कुलची शैक्षणिक सहल औरंगाबाद व पैठण या मराठवाड्यातील ऐतिहासिक ठीकाणी आनंदात संपन्न झाली. या सहलीमध्ये स्कुलची 1 ली ते 7 वी या वर्गातील 65 विद्यार्थी व 10 शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.
हि सहल शहरातुन म.रा.प.म.च्या बसमधुन निघाली प्रथम 12 ज्योतीलिंगपैकी एक प्रसिध्द घृणेश्वर मंदिरातील भगवान शिवशंकराचे दर्शन व हेमाडपंती मंदिर पाहण्यात आले. यानंतर जगप्रसिध्द वेरुळ येथील प्राचिण लेण्या दाखविण्यात आल्या. यामध्ये 13 बौध्द, 16 हिंदु, 5 जैन अशा एकुण 35 लेण्या असुन आधी कळस मग पाथा, या स्थापत्य कला प्रकारतले हे एक जागतिक आश्चर्य आहे.
मराठवाड्याचा इतिहास सबंधीत वस्तु संग्रालय पाहण्यात आले. पवनचक्की व ऐतिहासीक बीवी का मकबरा हा प्रसिध्द ताजमहल याची प्रतिकृती असलेली वास्तु दाखविण्यात आली. याठीकाणी सर्व विद्यार्थ्यांनी भोजनाचा आनंद घेवुन तिर्थ क्षेत्र पैठण, गोदावरी नदीच्या तीरावरील ऐतिहासीक व धार्मिक ठीकाणी भेट देवुन नाथसागर धरण, ज्ञानेश्वर उद्यान, संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान, जरीकाम, पैठणी साड्यांचा उद्योग, अदि ठीकाणी भेट देवुन सहलीमध्ये एकंदरीत ऐतिहासीक, धार्मिक, प्राचीन, जगप्रसिध्द आश्चर्य असलेल्या वास्तुला भेट देवुन विद्यार्थ्यांनी या विषयांच्या अनुभवातुन शिक्षण देण्यात आले. सहल यशस्वी करण्यासाठी स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, सिध्देश्वर सुरवसे, प्रकाश तोडकरी, हारुण हेड्डे, विशाल मुनाळे, मिस. सविता जाधव, अनुराधा बंडगर, वर्षा शेवाळे, पुजा दाळींबकर, सोनाली राठोड, सुवर्णा पाटील, अदिंनी परिश्रम घेतले.
