शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास शासन अपयशी -खा.अशोक चव्हाण



  • तालुक्यात जनसंघर्ष यात्रेला जंगी प्रतिसाद 

मुर्तिजापूर :- शेतकरी दुष्क्काळाने होरपळून चाललेला आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण शासनाने चाऱ्याची कुठलीच सोय केलेली नाही. दुष्काळाची घोषणा करून औपचारिकता पूर्ण केली आहे , पण प्रत्यक्षात दुष्काळाच्या सवलती अद्याप दिल्या गेल्या नाहीत. राम शिंदे यांनी केलेलं वक्त्याव बेजबाबदार आहे,जबादारीने मंत्र्यांनी वागलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.

 खा.अशोक चव्हाण यांनी राम शिंदेवर खळबळ जनक टीकास्त्र सोडले. ते संघर्ष यात्रे निमित्य मूर्तिजापूर येथे आले असता बोलत होते. त्यांच्या हस्ते येथील दोन कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून त्यांचे आगमन तालुक्यातील लाखपुरी येेेथे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल व जिल्हा ग्रामीणचे  उपाध्यक्ष बबनराव डाबेराव तसेच जिल्ह्यातील  पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरीकांनी  जल्लोषात स्वागत  केले . यावेळी जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील काँग्रेसचे पदाधिकारी व लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर येथील शहरातील रस्त्यावरील  पुंडलिक नगर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर शहरात यात्रेेेचे महाराणा प्रताप चौकात  जोरदार स्वागत झाले.

येथील अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आणि अकोला मुर्तीजापुर तालुका काँग्रेस कमिटी तसेच शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत त्यांनी सांगितले की, जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास शासनाला वेळ नाही. गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही. आता तरी सर्वांनी गेल्या 70 वर्षांपासून सेवा करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा साथ द्यावी असे आवाहन केले .त्यांच्या हस्ते मुर्तीजापुर येथील वयोवृद्ध व आजन्म काँग्रेसची सेवा करणारे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते बच्चुभाई गोयल, दादा जमादार,अशोक दुबे, रा.न.पातालबन्शी यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी उपस्थित  अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हिदायक पटेल  तसेच अकोला जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव,तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड,      उपाध्यक्ष रोहित सोळंके,माजी शहर अध्यक्ष धीरज अग्रवाल, मुर्तीजापुर विधानसभा  युवक काँग्रेसचे अध्यक्ष मो.शहाबुद्दिन नगरसेवक भारत जेठवानी, बाळासाहेब बाजड, शहराध्यक्ष दिनेश दुबे, अशोक दुबे, अमोल तातुरकर, अनिताताई तिवारी, सुनील वानखडे, शिवा डाबेराव यांनी खासदार तथा माजी  मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे स्वागत केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महानिर्वाण दिन असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी अभिवादन केले.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.  सूत्रसंचालन अशोक दुबे यांनी केले. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post