मुस्लिम समाजाला आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू - धरणे आन्दोलनात जमियतचा इशारा


मक़सूद अली
यवतमाळ :- जमीयत ए उलेमा हिन्द द्वारे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या तिरंगा चौकात जमीयत ए उलेमा हिन्द संघटनेच्यावतीने धरणे आन्दोलन करण्यात आले.

राज्य सरकारने तातडीने रद्द केलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा लागू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला.आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ईतर समाजाला देण्याचा आश्वासन देत आहे मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करत नसल्याचा आरोप जमियतचे जिल्हा सचिव मुफ्ती एजाज यांनी केले.राज्य सरकारनं तातडीनं आरक्षण द्यावं अन्यथा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरू असा सूर या धरणे आंदोलनातुन व्यक्त करण्यात केला गेला.


मुस्लिम समाजाला शिक्षण, आर्थिक, सामाजिक, व देशाच्या मुख्य प्रवाहात आणून,मुस्लिम समाजासाठी प्रतिशत आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली.अन्य सर्व माँगासलेल्या समाजासाठी लागू करण्यात आलेल्या आरक्षणाचे जमीयत ने नेहमी समर्थन केले आहे,मात्र मुस्लिम समाजासाठी आरक्षण लागू होत नसल्याने हा मुस्लिम समाजावर अन्याय आहे,आज समाज सर्व क्षेत्रात माघारला असून, प्रगतिसाठी घटनात्मकरित्या आरक्षण लागू करण्यासाठी जस्टिस राजेन्द्र सच्चर आयोग,,महेमुदुर्ह्मान कमिटी, रंगनाथन मिश्रा आयोग आदिनी मुस्लिम समाजासाठी आरक्षण लागू करण्याची शिफ़ारसी केंद्र सरकारकडे केलेल्या असून,याची विस्तृत रिपोर्ट ही सरकारकडे उपलब्ध आहे,मात्र आरक्षण लागू करण्यात आले नाही,ही शोकांतिका आहे,

या आन्दोलनात समाज बांधव व विविध संघटनांनी सहभाग नोंदविला तसेच जमीयतचे  जिल्ह्याचे पदाधिकारी,मौलवी याकूब,मौलवी शारिक,मौलवी फजलुर्रहमान, हाफ़िज़ ज़ुबैर,जिया मिनाई अडव्होकेट जयसिंग चव्हाण,एमपीजे प्रा.सय्यद मोहसीन,अडव्होकेट इम्रान देशमुख ,डॉ.इर्शाद खान,जमील पटेल ,जमियतचे शहर सचिव वसीम खान व मुस्लिम समाजाचे विविध क्षेत्रात सक्रिय मान्यवर नागरिक युवक सामिल झाले. मुस्लिम आरक्षण लागू करण्याची मागणी करीत जमीयत चे शिष्टमण्डलाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिलाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फ़त निवेदन पाठविन्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post