इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान येथे दिवाळी सणानिमित्य पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोजित केलेल्या “स्वराविष्कार” अक्कलकोट प्रस्तुत, ‘मंगलस्वर’ या पहाटगाण्याच्या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केल.
सुरुवातीला शास्त्रीय संगीतातील गीत सादर करत रसिकांची चांगलीच दाद मिळवली व त्यानंतर सूर निरागस हो, प्रभाती सूर,तुझ मागतो मी आता,तू सुखकर्ता,अबीर गुलाल,पैलतोगे काऊ कोकताये,स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो,बाजे रे मुरलीयां बाजे,विठ्ठला तू वेडा कुंभार,स्वामी कृपा कधी करणार व त्याच बरोबर भाग्यदा लक्ष्मी बारम्मा,देव बंदानम्मा,गुरुवार बंतम्मा अश्या कन्नड गाणे सादर करत कार्यक्रमाचे मुख्य गायक मयूर स्वामी,आदित्य जोशी,आकाश चव्हाण, स्नेहल कडगंची, शिवशंकर स्वामी,
यांनी गित गावुन उपस्थितांचे मने जिंकली.यावेळी कार्यक्रमामध्ये हार्मोनियम साथ ओंकार पाठक तर तबला साथ अक्षय सरदेशमुख व मल्लिकार्जुन कुंभार यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी पुजारी व सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार मयूर स्वामी यांनी मानले.यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,मंदार पुजारी,अशोक कडगंची,प्रा.किशोर थोरे,प्रा.डॉ.शंकर धडके,संतोष वगाले,प्रसाद राजोपाध्ये,शुभम पुजारी, प्रसन्न जोशी,इरेश फताटे,महेश स्वामी,यांच्यासह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.