इकबाल मुल्ला
लाेहारा/प्रतिनिधी :- रॉबिनहुड आर्मी उस्मानाबाद व सह्याद्रि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उस्मानाद यांच्यावतीने शहरातील कुष्ठधाम येथे 7 ऑक्टोंबर राेजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबीरात सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, उस्मानाबाद चे डॉ.दिग्गज दापके-देशमुख,डॉ.सतीश गवाड,यांनी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन मोफत औषध गोळ्या वाटप करण्यात आले.
तसेच आरोग्य तपासणी शिबीर झाल्यानंतर मधूनबन कुष्ठधाम मधील राहत असलेल्या सर्व सदस्यांच्या कपिल नवगिरे (बारूळ.ता.तुळजापूर) यांच्यावतीने भोजन वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे,दादासाहेब कोरके,रॉबिनहूड आर्मीचे अक्षय माने,सुरज मस्के,अॅड विशाल साखरे, अमृता माने,नवज्योत शिंगाडे,प्रा.सोहन कांबळे, धम्मपाल बनसोडे,भाग्यश्री सुगावे,धनश्री सुगावे, आकाश घंटे,विकी राऊत,राहुल गायकवाड,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

