इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- प्रहार जनशक्ती पक्ष उस्मानाबाद व सह्याद्रि मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल उस्मानाबाद,उपजिल्हा रुग्णालय,तुळजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत तुळजापुर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील हनुमान मंदिर झेंडा चाैकात दि.8 ऑक्टोंबर रोजी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.या शिबीरास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी मोफत कर्णतपासणी,मोफत श्रवणयंत्र वाटप नोंदणी व मोफत नेत्रतपासणी,मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,असे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्रि मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल चे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख
दिग्गज,प्र.वैद्यकीय अधिकारी,डॉ.एच.व्ही होनमाने,
वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल वाघमारे(सलगरा),
युवा नेते प्रशांत उत्तमराव लोमटे,डॉ.अनिल जाधव (कान तज्ञ सह्याद्रि हॉस्पीटल उस्मानाबाद),डॉ.बंडगर (नेत्रचिकित्सालय प्राथमिक आरोग्यकेंद्र सलगरा दि),डॉ.गुंड (नेत्रचिकित्सालय उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर),जनशक्ती प्रहार पक्ष जिल्हा प्रमुख केदार साैदागर,विधानसभा तालुका प्रमुख आण्णासाहेब दराडे (तुळजापुर),कायदा सल्लागार अँड.जयपाल पाटील,तालुका अध्यक्ष शशिकांत मुळे,तालुका अध्यक्ष जुबेर शेख,अजित हुंडेकरी,जिवन साखरे, जिवन साखरे,सागर मुळे,वाहुल बोदणे,अदि उपस्थित होते.
या शिबीरात 210 जणांची कर्ण व नेत्र तपासणी करण्यात आली.या शिबिरात 60 रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मिळणार आहेत.व 50 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.100 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.या शिबीरास प्रहार जनशक्ति पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

