लोहारा येथील देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात पालक,शिक्षक,विद्यार्थी सुसंवाद सभा संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील देवगिरी ग्लोबल अँकँडमी कनिष्ठ महाविद्यालयात पालक,शिक्षक,विद्यार्थी सुसंवाद सभा घेण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डि.एस.बिराजदार होते.यावेळी प्रमुख म्हणुन  प्राचार्य विवेकानंद पाटील,भालचंद्र जाधव (रजिस्टार), प्रा.यशवंत चंदनशिवे (पर्यवेक्षक),अदि उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलाने करण्यात आली. यावेळी प्रा.चंदनशिवे म्हणाले कि,पालकांची खरी इनवेस्टमेन्ट हि त्याची पाल्य आहेत.हि इनवेस्टमेन्ट योग्य ठिकाणी करावी लागते.आमचे महाविद्यालय तुम्ही केलेल्या इनवेस्टमेन्ट मध्ये भरीव असा परतावा दिल्याशिवाय राहणार नाही.जेई,निट,या परिक्षेची तयारी अकरावी पासूनच महाविद्यालयात करून आम्ही घेत आहोत.

यावेळी प्राचार्य डॉ.डी.एस.बिराजदार अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि,आमदार सतिश भाऊ चव्हाण साहेब (सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) याचे स्वप्न आहे.ग्रामीण भागातले मुलं,मुली,डॉक्टर,इंजिनिअर,प्रशासकीय अधिकारी बनले पाहिजेत.काँपीमुक्त वातावरणात त्यानीं परिक्षा दिल्या पाहिजेत.हि तुमची मुलं दोन वर्षासाठी आम्हाला दत्तक दिलात असे समजा त्यांना आदर्श नागरिक बनवून या कँम्पसच्या बाहेर पाठवू ,असे सांगीतले.

यावेळी प्राचार्य विवेकानंद पाटील,वैजनाथ पाटील ( यपालक लोहारा) आकाश स्वामी (विद्यार्थी) यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पल्लवी कलशेट्टी यांनी केले तर आभार प्रा.श्रीमती उमा हालकुडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शिवराज मानेगोपाळे,प्रा.प्रकाश जोमदे,प्रा.अशोक भोसले,प्रा.श्रीमती रत्नमाला पवार, प्रा.श्रीमती मधुमती पाटील,प्रा.श्रीमती अम्रता दिक्षीत, बालाजी जगताप,गणेश गरड,बाळु गुरव,अदिंनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पालक,शिक्षक,विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post