इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शिक्षक चांगल्या पध्दतीने विद्यार्थ्यांबरोबरच समाज घडविण्याचे काम करतात.शिक्षकांचे योगदान खरोखरच मोठे व वाखाण्याजोगे आहे.त्यामुळे शिक्षकांच्या कामाची ओळख समाजापुढे विविध उपक्रमाच्या माध्यमातून आणणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन लोकमंगल मल्टीस्टेट व लोकमंगल ङ्गाऊंडेनशचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले.
लोकमंगल मल्टीस्टेट व लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दि.2 ऑक्टोंबर रोजी जि.प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला.यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे,प्रभाकर मुळे,दत्ताभाऊ राजमाने,भाजपा तालुका अध्यक्ष सत्यवान सुरवसे (तुळजापुर),ज्ञानेश्वर माऊली महाराज,भाजपा जिल्हा संगटन मंत्री सतिश बप्पा देशमुख,जि.प.सदस्य राजगुरु माऊली,भाजपा तालुका अध्यक्ष दत्ता सोनटक्के(उस्मानाबाद),दत्ता राजमाने,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे, दिनकरराव जावळे पाटील,अदि उपस्थित होते
यावेळी रोहन देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, लोकमंगल समुहाच्या माध्यमातून विविध समाजिक उपक्रम राबविले जात असून,त्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा,आरोग्य शिबीर,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी आर्थिक मदत याचा समावेश होत असून,शिक्षक क्षेत्रात चांगले काम करणार्या शिक्षकांना पुरस्कार देवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे.माणूस प्रतिकूल परिस्थितीच्या माध्यमातून सतत शिकत असतो.त्याप्रमाणे लहानपणी जे त्या व्यक्तींवर संस्कार होतात त्यानुसार ती व्यक्ती घडते.समाजात मोठ्या प्रमाणात गरिबी असल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी येतात.त्यामुळे 12 वी पास असणार्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे आणावे असे आवाहन करून ते म्हणाले की,उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांना नोकरीबरोबरच इतर क्षेत्रात मार्गदर्शन व्हावे यासाठी एमपीएस व युपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व तसेच शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव म्हणाले की, गुणवंतांचा सन्मान करण्यासाठी हृदयाची विशालता व बुध्दीची शुध्दता लागले.हे दोन्ही संयोजकांकडे आहेत. त्यामुळेच त्यांनी या शिक्षकांचा याठिकाणी सन्मान केला आहे.व त्याचे हे कार्य आजपर्यंत सतत सुरू आहे.तसेच केवळ पगारापुरते शिक्षक काम न करतात ते त्या चौकटीच्या बाहेर जावून काम करतात.अशांचा शोध घेवून त्यांचा सन्मान लोकमंगल परिवाराकडून होतो याचे मला खरोखरोच कौतुक वाटत असल्याचे त्यांन नमुद केले.यावेळी प्रस्तावित ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणाले की,सगळे शिक्षक चांगले काम करतात.परंतु त्यापैकीच खड्यासारखे वेचून अशा शिक्षकांची निवड केली जाते.त्याचबरोबर लोकमंगल समाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून आपल्या सामाजिकतेचे भान विसरत नसल्याचे सांगून ते म्हणाले की,गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी रोहन-कोमल कॉलरशीप सुरू केली असून,त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना होत असून, समाजाच्या तळागाळा गेल्याशिवाय प्रगतीचा चेडू हाती लागल नसल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी रणजीत कदम,अनिल यादव यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्राथमिक विद्यालयातील बनसोडे नागनाथ मारुती,नवले बाहुबली श्रेणिक,संदीकर धनंजय मुकेंदराव,क्षीरसागर वेशाली पांडुरंग,राजेंद्र बाबासाहेब टाचतोडे,सुर्यवंशी सचिन श्रीराम,कदम रणजित नरसिंगराव,बुरंगे किशोरकुमार नवनाथ,कुटे राजश्री भरत,पांचाळ दत्तात्रय संदिपान,पंडीत सोपान जाधव, पवार लता प्रभाकर,बाबासाहेब रावसाहेब जगताप, खामकर भास्कर किसनराव गणेश,प्रा.डॉ.रविंद्र व्यंकटराव कराटे,मोरे सुरेखा श्रीपती,अमोल धोंडीराम कस्तुरे,यादगिरे प्रकाश फुलचंद,नाईकवाडे विजयकांत शिवहारी,डॉ.नानासाहेब पंडीतराव मनाळे,भगवान धर्मा चौगुले,मोरे सुरेखा श्रीपती या उस्मानाबाद जिल्ह्यातील 21 शिक्षकांना रोहन देशमुख व मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरपडे विठ्ठल यांनी तर आभार लिंबराज साळुंके यांनी मानले.
प्रारंभी महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री,
सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास छत्रपती खा.संभाजीराजे महाराज यांचे स्विय सहाय्यक योगेश केदार,बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील,हाजी बाबा शेख,अजित ढोणे,अनिल ओवांडकर,पं.स.सदस्य वामन डावरे, इकबाल मुल्ला,दिनेश बायस,शिवशंकर हत्तरगे,संतोष आगलावे,सुभाष करसुले,मकरंद लबडे,विनोद देवकर,विनोद क्षीरसागर,बालाजी चव्हाण,दिलीप येडगे,शंकरअप्पा मुळे,दत्ता कडबाने,यांच्यासह शिक्षक,महिला,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

