'महागाईचा आगडोंब; ५६ इंच छातीवाले गप्प का?'


नवी दिल्ली :- डॉलरच्या तुलनेत सातत्याने होत असलेल्या रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'महागाईचा आगडोंब उसळला आहे. लोकांमध्ये हाहाकार माजला आहे. अशा वेळी ५६ इंच छातीवाले गप्प का आहेत?' असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर काव्यात्मक शैलीत निशाना साधला.' रुपया गेला ७३ पार, महागाईने माजवला हाहाकार. तेल-गॅसलाही लागली आग, बाजारातही सुरू आहे भागम-भाग. ५६ इंचच्या छातीवाल्यांनो कुठवर चालणार 'सायलंट मोड', सांगा तरी कुठं आहे 'अच्छे दिनचं कोड'?', अशा काव्यात्मक शैलीत राहुल यांनी भाजपवर टीका केली आहे. बुधवारी शेअर बाजार सुरू होताच एका डॉलरची किंमत ७३ रुपये ३४ पैशावर गेली होती. त्याचा संदर्भ देत राहुल यांनी भाजपला ट्विटरवरून घेरण्याचा प्रयत्न केला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post