तिर्थ क्षेत्र लाखपुरी येथे भव्य कावळ यात्रा रविवारला..


अतुल नवघरे                               
लाखपुरी : विदर्भातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र श्री. लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे  दरवर्षी प्रमाणे श्रावणमहिन्यातील शेवटच्या रविवारी दि. २ सप्टेंबर ला सायकाळी भव्य कावळ यात्रा सपन्न होणार आहे. कावड यात्रेत मुर्तिजापुर , दर्यापुर व अजनगांव तालुक्यातील शेकडो कावड मंडळासह हजारो शिवभक्त सहभागी होणार आहे. कावड यात्रेची जय्यंत तयारी झाली असुन शिवभक्तांन करिता विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहनतळ व्यवस्था नदी पर्यंत रस्ता दुरुस्ती व नदीवर हँलोजन व्यवस्था , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , आपातकालीन पथक , आरोग्य पथक ,अँम्बुलन्स , महाप्रसाद व्यवस्था , इ. व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत कावड यात्रेला संत महात्मे विविध लोकप्रतिनीधी , अधिकारी वर्ग , सामाजिक कार्यकर्ते , कावड यात्रेचे आश्रय दाते इत्यादी उपस्थीती राहील. तरि सर्व शिवभक्तांनी या कावळ उत्सहाचा लाभ घ्यावा असे सार्वजनिक कावड उत्सव समिती कडुन करण्याय आली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post