- पहिल्याच वर्षी एकता मंडळाची ५१ भरण्याची कावड
- प्रविण वैष्णव
तेल्हारा ता.प्र .दि . ३/०९/२०१८ तेल्हारा येथे कावड यात्रेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.यावर्षी देखील शहरातील जय भवानी मंडळ ,न्यू भवानी मंडळ ,व एकता मंडळाच्या वतीने कावडयात्रा काढण्यात आली .आडसूळ येथील पूर्णा नदीपात्रातून पवित्र जल रात्रभर पायी चालत कावडधर्यानी आपल्या कावड आणल्या .तसेच शहरातून टावर चौक ,स्थित जनता बँक परिसरातून श्री गौतमेश्वर संस्थान पालखीची आरती व पूजन करून कावड शोभायात्राला सुरुवात झाली हि शोभा यात्रा पोलीस स्टेशन ,संताजी चौक ,प्रताप चौक , बजरंग चौक ,संभाजी चौक ,शिवाजी चौक ,आठवडी बाजार,तानाजी चौक ,येथून जाऊन गौतमेश्वर संस्थान येथे गौतमेश्वराला जलअभिषेक अर्पण करण्यात आला .कावड यात्रे दरम्यान बजरंग चौक व शिवाजी चौक यांच्या वतीने पाणी व संभाजी चौक येथे फराळ व दुध वाटप करण्यात आले होते .गौतमेश्वर संस्थान येथे गौतमेश्वर शिव भक्त मंडळाच्यावतीने कावडधार्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी श्री गौत्मेश्वराची शिव आरती करून या उत्साहाची सांगता करण्यात आली . या कावड यात्रे दरम्यान शहरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता यावेळी शहरातील नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केल्याबद्दल व पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केल्या मुळे कावड यात्रा शांततेने संपन्न झाली.
