यवतमाळ(प्रतिनिधी) : प्रचंड वाढती महागाई व शेतकऱ्यांचे प्रश्न या संदर्भात कॉंगे्रस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेसह समविचारी विरोधी पक्षाच्या वतीने यवतमाळ जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यातून या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत 110 डॉलर्स प्रति बॅरल होती.
तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोलचा भाव 80 रुपये तर डिझेल 64 रुपये प्रति लीटर होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत सुमारे 80 डॉलर प्रति बॅरल म्हणजेच 2014 च्या तुलनेत 30 डॉलरने कमी आहे. तरीही आज मुंबईसह राज्यात पेट्रोलचे दर 87.77 रुपये आणि डिझेलचे दर 76 रुपये 96 पैसे एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लुट करीत आहे. इंधन दरवाढभमुळेच वाढलेल्या महागाईने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने त्वरीत पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, व सर्व सामान्यांना दिलासा द्यावा.
या मागणीसाठी दि. 10 सप्टे. रोजी देशव्यापी बंद अंतर्गत यवतमाळ जिल्हा बंदच्या आवाहनाला प्रत्येक तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ.प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांचे नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी या पक्षांचा सहभाग या बंदमध्ये होता.
जिल्हाधिकारी देशमुख यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.वजाहत मिर्झा, आ.ख्वाजा बेग, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संध्याताई सवालाखे, विजयाताई धोटे, बाळासाहेब मांगुळकर, राहुल ठाकरे, देवा शिवरामवार, अनिल हमदापूरे, आसिम अली,बाबासाहेब गाडे पाटील, चंद्रशेखर चौधरी, क्रांती राउत, अनिल गायकवाड,कुष्ण पुसनाके, जितेश नावड़े, उत्तम गुल्हाने, सिकंदरशाह,नगर सेवक जावेद अन्सारी, बबली भाई , सय्यद इस्तीहात,करीम खान,अड़ सलीम शाह,सतीश मानधना, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिष्टमंडळाने मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.


