रावेर तालुक्यातील बोगस डॉक्टरांना,औषध पुरवणारा मेडीकल एजन्सी डिलर कोण


भुषण महाजन
रावेर,प्रतिनिधी :- रावेर तालुक्यातील पिप्री जुनोना अभोडा जिन्सी पाल,आहिरवाडी  मोरव्हाल लोहारा खिरवळ अजदा या परिसरातील बोगस डाँक्टराना,इजेक्शन.सलाईन,मेडीसिन,पुरवठा करणारा एजन्सी धारक कोण या डाँक्टराना दिलेले मेडिसीन चे कोणाच्या नावाने फाडले, यांची  चौकशी होने गरजेचे आहे

मात्र तालुक्यातील आरोप यत्रना सलाईन वर,असल्यामुळे  आदिवासीबहुल ग्रामीण भागातील नागरिकांना चक्क बोगस डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. पंचायत समिती व आरोग्य विभागाच्या आशीर्वादाने या बोगस डॉक्टरांनी खुलेआम आपली पॅ्रक्टिस सुरू ठेवली आहे. यातील अनेक जणांनी केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांतून बोगस पदव्या मिळवून प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे.

आदिवासी वाडयापाडयांवर या डॉक्टरांचे फिरते दवाखानेही सुरू असतात. माफक फी आणि झटपट आराम हा फंडा अनेक डॉक्टर राबवत असल्यामुळे आदिवासी, गोरगरीब रुग्णांचा कल याच डॉक्टरांकडे असतो. मात्र या डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी किंवा ज्ञान नसल्याने त्यांचे उपचार रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेकदा आरोग्य प्रशासन आणि संबंधित अधिका-यांकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र या डॉक्टरांच्या दबावापुढे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे.

आम्ही तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सद्यस्थितीच्या आढावा बैठकीत बोगस डॉक्टरांसंदर्भात विषय घेतला आहे. ज्या डॉक्टरांवर कारवाई होऊनही त्यांनी पॅ्रक्टिस सुरू ठेवली असेल, त्यांच्यावर पुन्हा कारवाईचा बडगा उगारला जाईल. तसेच कोणी नवीन खासगी डॉक्टरने पॅ्रक्टिस सुरू केल्यास त्याच्याकडे असलेल्या महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे.- मात्र झोल छाप डाँक्टरानी आपले दुकाने थाटले तरी वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन याना मेडिसीन महाशय कोण याचा शोध लावुन कारवाई चा बडगा उगारावा,अशी रास्त अपेक्षा आता होत आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post