लोहारा येथील जि.प.कें.प्रा.शाळेने विविध उपक्रम राबविल्याने यांना रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने पुरस्कार प्रदान


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील जि.प.के.प्रा.शाळेने विविध उपक्रम राबवुन शाळेची प्रगती केल्याने उमरगा येथील रोटरी क्लब यांच्यावतीने या शाळेला पुरस्कार देवुन  सन्मानित करण्यात आले.यावेळी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन नगराध्यक्षा सौ.प्रेमलता टोपगे(उमरगा),रोटरी क्लब चे सचिव डाॅ.धनंजय मेनकुदळे, डायरेक्टर प्रविण स्वामी,डाॅ.संजयअस्वले,डाॅ.दिपक पोफळे,अदि उपस्थित होते.

या शाळेने शिष्यवृती,नवोदय,उत्कृष्ट गुणवत्ता,विविध शालेय स्पर्धा,भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा,उत्कृष्ट शैक्षणिक सहल,जिल्हयातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा,प्रयोगशाळा,सौरऊर्जा,100% उपस्थिती,साहसी प्रात्य.खेळ,विद्यार्थी पोलीस स्टेशन भेट व शश्त्र हाताळणी,जि.प,प.स,प्रशासनाची माहीती वसंकलन,शाळेतील उपक्रमशिल शिक्षक,ज्ञानरचनावादी वर्ग,शै.साहित्य निर्मिती,इयत्ता 6 वी 7 वी मुलीसाठी हस्तकला प्रदर्शन,हॅलो मेडीकल फाउंडेशन यांच्यावतीने  घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यानी यश मिळविले,परीसरातील व्यवसाय कलाकारांचे भेट,सांस्कृतिक कार्यक्रम,उत्कृष्ट परिपाठ,अशी विविध राबवुन शाळेची प्रगती केली आहे.या सर्व कार्याची दखल घेवुन या शाळेला रोटरी क्लब उमरगा यांच्यावतीने पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे,शिक्षक  सुरेश वाघमोडे,तानाजी दबडे,संतोष माळवदकर, दत्तात्रय फावडे,यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.या शाळेला पुरस्कार मिळाल्याने मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा लोहारा शहरातुन व तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post