मोहगम च्या ग्रा प,सदस्याचा प्रताप कोणतीही परवानगी न घेता तोडले 20 वर्ष जुने वृक्ष


भुषण महाजन
रावेल :- रावेर तालुक्याच्या मोहगाव गावातील एका सदस्याने.20वर्ष पुर्वीचे जुने वृक्ष कोणतीही परवानगी न घेता तोडण्याचा पराक्रम या बहाद्दर सदस्याने केला आहे काही नागरिकांनी वृक्ष तोडण्यास विरोध केला मात्र त्यांना ही न जुमानता या सत्तेचा माज आलेल्या या सदस्य याने ते,वृक्ष तोडले या बाबत वनविभागात देखील तक्रार करण्यात आली

असुन अद्यापही त्या सदस्या वर कोणतीच कारवाई झाली  शासनाने येत्या तीन वर्षामध्ये वनविभागासह शासनाच्या सर्व  विभागामार्फत  वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात  वृक्ष लागवड करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. तर दुसरीकडे रावेर तालुक्याच्या मोहगम गावा मधील एका ग्रामपचायत सदस्याने वनविभागाची परवानगी न घेता वृक्ष तोड तोडले  ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वृक्षतोड ते वनक्षेत्र कर्तव्य दक्ष असून त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष द्यावे   अशा मुजोर व सत्तेचा माज आलेला तो ग्रा,प सदस्य कोण याचा छडा लावुन कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी वृक्ष प्रेमींची मागणी आहे.


 वाढत चाललेले तापमान, अनियमीत पडणारा पाऊस, दुष्काळ, पाण्याची भिषण टंचाई, यावर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीवर करोडो रुपये खर्च करीत आहे. आणि काही मुजोर आपल्या आर्थिक लाभा पोटी वृक्षाच्ची कत्तल केली जात आहे तरी रावेर वनविभागाचे कर्तव्य दक्ष वनक्षेत्र पाल यांनी चौकशी करून कारवाई चा बडगा रुगारावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post