जमियते उल्मा - ए- हिंद चा पुरपीडितासाठी हित जोपासणारा सामाजिक अभिनव उपक्रम



  • गवळीपुरा येथील मदिना मस्जिद परिसरात पूरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप 

विशेष प्रतिनिधि मक़सूद अली 
दिग्रस :- दिग्रस शहरात १६ ऑगस्ट २०१८ रोजी आलेल्या महा प्रलयंकारी महापुरात हजारो घरे एका क्षणात उध्वस्त झाले होते, अनेकांच्या घराच्या भिंती सह छप्पर,भांडी-कुंडी सुद्धा या महापुराने वाहून नेले त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले.या महापुरामुळे अनेकांच्या घरात घरामध्ये खायला अन्न,वस्त्र,निवारा सुद्धा शिल्लक राहिला नव्हता.तेव्हा अनेक ठिकाणी या पुरपीडितांना मदतीचा हात म्हणून राहायला समाजमंदिरे,शाळा व मंदिरात राहायला काही दिवसासाठी जागा देण्यात आली. मात्र आपला संसार  चालवण्यासाठी स्वतःचे घरे असणे गरजेचे असते.


तेव्हा त्यांच्या या बाबीची गांभीर्याने दखल घेतली ती म्हणजे जमियते उल्मा - ए- हिंद सामाजिक बांधिलकी जोपासणारी शाखेने आणि त्यांनी पुरपीडितांना संसार उपयोगी साहित्य वाटप करून नव्याने संसार थाटण्यासाठी मदतीला धावले.या महापुरात एकूण ३५० कुटुंबीय जमीनदोस्त झाल्याचा सर्व्हेक्षण करून त्यांना आज दि.२७ ऑगस्ट रोजी घरावरील टिन पत्रे,बांबूच्या ताट्या,संसार उपयोगी भांडी-कुंडी,अन्न, धान्यसह आर्थिक मदत दिली.आपद्ग्रस्तांना जमियते उल्मा - ए- हिंद शाखेने नवीन जीवन जगण्यासाठी एक प्रकारे बळ दिले त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


दिग्रस शहरात दि.१६ ऑगष्ट २०१८ रोजी आलेल्या या महापुरात शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य सुद्धा वाहून गेले होते. अश्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वह्या, पुस्तक,पेन, पेन्सिल,स्कूल बॅग सह विद्यार्थ्यांना वर्ग नुसार साहित्य वाटप करण्यात आले.
अनेक पुरपीडित महिला व पुरुषांनी जीवनावश्यक वस्तूचे दिग्रस येथील मदिना मस्जिद गवळीपुरा येथे वाटप होत असल्याची माहिती मिळताच गवळीपुरा येथील मदिना मस्जिद समोर मदतीसाठी आले तेव्हा त्यांना सुद्धा मदत करण्यात आली.पुरपीडितांना भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तू स्वीकारत अनेक बेघर कुटुंबीयांनी जमियते उल्मा ए हिंद चे मनापासून आभार व्यक्त केले.


जमियते उल्मा ए हिंद दिग्रस यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.या सामाजिक कार्यात दिग्रस शहरातील मौलाना व सर्व मुस्लिम गवळी समाजातील सर्व बांधवांन्नी उपस्थित राहून सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post