इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आरोग्यसेवा आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील उंबरे कोठा येथे दि.12 ऑगस्ट रोजी हिंदवी युवा प्रतिष्ठान या संघटनेच्या स्थापने निम्मित्त सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उस्मानाबाद व हिंदवी युवा प्रतिष्ठाण,उंबरे कोठा धाराशीव यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबीर घेण्यात आले.या शिबीरास ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.यावेळी प्रमुख म्हणुन अमित भैय्या उंबरे, हरिभाऊ उंबरे,नेताजी राठोड,डाॅ दापके-देशमुख दिग्गज,संतोष पवार,डॉ.बारकुल मॅडम,डॉ.सय्यद एजाज,राजेश शिरगिरे,मजहर पठाण,दादासाहेब कोरके,ज्ञानेश्वर ढवण,हिंदवी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक स्वराज भोरे,अध्यक्ष माऊली शेजुळ, उपाध्यक्ष रोहित पांढरे,सचिव जय भोरे,सुनीत ओव्हाळ,बालाजी सातपुते,ओमकार बुगडे,सौरभ शिंदे,पंकज गपाट,अजय मुंडे,कुणाल महाजन, प्रज्योत जगदाळे,मोहित पांढरे,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली शेजुळ यांनी केले.या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
