मुंबई :- मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी २३४४ विद्यार्थी जातप्रमाणपत्र ऑनलाइन सादर करू शकले नाहीत. जातप्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मुदतही १० ऑगस्टला संपली होती. मात्र अखेरच्या क्षणी तंत्रशिक्षण संचालकांकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली व प्राधिकरणानेही आता १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या जातपडताळणी तसेच प्रवेशासाठी मुदत वाढवून दिली आहे
तातडीने हालचाल.
सीईटीमार्फत प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केली जाते. १० ऑगस्टची मुदत संपल्यामुळे २३४४ विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राचा प्रश्न निर्माण झाला होता. जातप्रमाणपत्राची मुदत संपल्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकला नसता. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने तातडीने प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानुसार या प्रवेशासाठी तसेच जातप्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
