इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे आमदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रु. खर्चून बांधलेल्या सभामंडपाचे व २५/१५ अंतर्गत १० लक्ष रु. खर्चून करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक अप्पासाहेब रोडे होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे,माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी,नगराध्यक्ष पौर्णिमा जगदिश लांडगे,कृ.उ.बा. समितीचे सभापती अच्चूत साठे,युवा सेना ता.प्र.दीपक मुळे,बाजार समितीचे उपसभापती आनंदराव सूर्यवंशी,अमोल सोमवंशी, ज्ञानेश्वर डोंगरे,प्रा.महादेव कोकाटे,राजेंद्र काळप्पा, सुल्तानपुरे(सरपंच) आष्टा(का),अल्ताफ पटेल(सरपंच) (दस्तापूर),नगरसेवक शाम नारायणकार,सुधीर घोडके,पंडित पाटील,जगन पाटील,विलास भगत, शहरप्रमुख सलीम शेख,ग्रामसेवक इंगळे,यांच्यासह आष्टा(का),भोसगा,जेवळी,परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

