नालासोपारा स्फोटकांप्रकरणी १४ जण ताब्यात



मुंबई/पुणे :- नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या बॉम्ब आणि स्फोटकांप्रकरणी काल तिघांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकानं आज राज्यभरातील विविध भागांतून १३ ते १४ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

नालासोपारा येथे दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) केलेल्या कारवाईत गावठी बॉम्बसह स्फोटकं जप्त केली होती. त्यानंतर नालासोपारा आणि पुण्यातून तिघांना अटक केली होती. त्यानंतर आज एटीएसनं राज्यभरात विविध ठिकाणी कारवाई केली. अटकेत असलेल्या तिघांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि त्यांच्याशी संपर्कात असलेल्या १३ ते १४ जणांना मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जातं.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post