प्रतिनिधि यवतमाळ :- बाभुळगाव येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत पुर्णवेळ शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकवर्गानीं एका निवेदनातून जिल्हा परिषदेवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे, याच आशयाची मागणी यापुर्वीही 31 जुलै 2017 व 2 नोव्हेंबर 2017 ला शिक्षणाधिकारी यांचेकडे करण्यात आली होती, परंतु याकडे लक्ष दिल्या गेले नाही.
पुर्णवेळ शिक्षक नसल्याने पाल्यांचे नुकसान होत असून याकरीता जबाबदार अधिकारींचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला. शाळेची पटसंख्या शंभरपेक्षा जास्त असल्याने आरटीई नुसार शाळेत पाच शिक्षकांचे पद आहे परंतु कार्यरत फक्त चार शिक्षक आहे, अन्य शिक्षक अतहरअली हे वेतन शाळेतून घेतात व काम प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे करीत असल्याचे कळते, जर येत्या आठ दिवसात शाळेला शिक्षक मिळाला नाही तर वर्ग आपल्या कार्यालयात बसविण्याचा इशारा यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षांनी दिला. निवेदनावर मो.शहेजाद शेख, मो.जावेद मो.रफीक, अलीम खान मुनवर खान, मो.वसीम मो.रफीक, आदींच्या स्वाक्षरी आहेत.
